Advertisement

अमिताभ बच्चन कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

प्रजापत्र | Friday, 15/03/2024
बातमी शेअर करा

मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

अभिनेता अमिताभ यांना आज पहाटे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त करत असतानाच बिग बींनी दुपारी एक्स मीडियात पोस्ट केलं. त्यामध्ये नेहमीच कृतज्ञ असल्याचं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांनी १४ मार्चला जलसा बंगल्यातून बाहेर येत चाहत्यांची भेट घेतली होती. त्याबाबत त्यांनी एक्स मीडियावर पोस्टदेखील केली होती. दुसऱ्याच दिवशी अमिताभ बच्चन यांची प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

 

Advertisement

Advertisement