दिल्ली-लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने बीडमधील उमेदवार बदलला आहे.विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपने माजी मंत्री असलेल्या त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली, यात नितीन गडकरी (नागपूर ) यांच्यासह बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल यावरून तर्कवितर्क लढवले जात होते.भाजप आपला उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र पंकजा मुंडे या लोकसभेसाठी फारशा इच्छुक नव्हत्या. मात्र अखेर आता त्यांच्याच गळ्यात बीड लोकसभेची उमेदवारी टाकण्यात आली आहे.भाजपने महाराष्ट्रातील २० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
बातमी शेअर करा