Advertisement

धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे !

प्रजापत्र | Wednesday, 13/03/2024
बातमी शेअर करा

मुंबई- राज्यात नव्याने घोषित करण्यात आलेल्या चौथ्या महिला धोरणातील नियमाची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अंमलबजावणी केली असून त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये लावली आहे. त्यामुळे आता धनंजय यांचे संपूर्ण नाव 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे नाव असणारी पाटी आता मंत्रालयात लावण्यात आली आहे. 

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच घोषित करण्यात आले. या महिला धोरणामध्ये स्त्री-पुरुष समानतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून आईचे आयुष्यातील स्थान देखील अधोरेखित करण्यात आले आहे. 

 

त्यामुळे आता नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली असून याची अंमलबजावणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयीन दालनात 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' अशा नावाची पाटी डौलाने उभी आहे!
 

Advertisement

Advertisement