लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने अनेक जुन्या मित्रपक्षांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. निवडणुकीत भाजपने ३७० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर "अब की पार एनडीए ४०० पार", असा नारा देखील दिला आहे. अशातच लोकसभेपूर्वी भाजपला तगडा झटका बसलाय.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी (जननायक जनता पक्ष) पक्षाची युती तुटली आहे. जेजेपीचे प्रमुख आदुष्यंत चौटाला यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीत यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे हरियाणामधील भाजपचे बहुमत कमी झाले असून लवकरच सरकार कोसळण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा