Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका

प्रजापत्र | Monday, 11/03/2024
बातमी शेअर करा

राजकीय पक्षांनी वटवलेल्या प्रत्येक निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवून मिळावी अशी मागणी करणाऱ्या स्टेट बँक इंडियाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाची याचिका फेटाळून लावत 24 तासांमध्ये निवडणूक रोख्यांचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निवडणूक रोख्यांना बेकायदा ठरवणा ऐतिहासिक निर्णय दिला होता. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आजवर वटवलेल्या रोख्यांचा तपशील 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाने 30 जून पर्यंतची मुदत वाढ मागितली होती. एसबीआयच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयची याचिका फेटाळून लावत 12 मार्चचे कामकाज संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत.
 

Advertisement

Advertisement