Advertisement

बारामती ॲग्रोने खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त

प्रजापत्र | Friday, 08/03/2024
बातमी शेअर करा

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमने-सामने आलेले आहेत. तसेच मागच्या काही काळापासून शरद पवार गटाचे रोहित पवार आणि भाजपा नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. 

ईडीने जप्त केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची किंमत ही सुमारे ५० कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच या प्रकरणामध्ये ईडीने सुमारे १६१ एकर जमीनही जप्त केली आहे. बारामती ॲग्रोकडून हा कारखाना खरेदी होत असताना शिखर बँकेने जी प्रक्रिया अवलंबली ती चुकीची असल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. 
 

Advertisement

Advertisement