जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झालीय. यामध्ये ना एलन मस्क, ना जेफ बेजोस सर्वात श्रीमंत आहेत, तर फ्रेंच उद्योगपती हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. बर्नार्ड अरनॉल्ट असं त्यांचं नाव आहे. तीन दिवसांत तिसऱ्यांदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे बदलली आहेत. तीन दिवसांपूर्वीपर्यंत, एलन मस्क प्रथम होते, मात्र, एक दिवसापूर्वी जेफ बेजोस यांनी मस्कला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. आता मस्क आणि बेजोस या दोघांनाही मागे टाकून अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत होण्याचा विक्रम ज्या व्यक्तीच्या नावावर आहे ते फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट आहे. लुई व्हिटॉन सारख्या लक्झरी ब्रँडचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती सध्या जगात सर्वाधिक आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकावर बर्नार्ड अरनॉल्टची एकूण संपत्ती आता 197 अब्ज डॉलर इतकी आहे. जी जगातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त आहे.
जेफ बेजोस 196 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर
जेफ बेजोस हे 196 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. प्रदीर्घ काळ पहिल्या स्थानावर राहिलेल्या एलन मस्कची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार एलन मस्कची एकूण संपत्ती सध्या 189 अब्ज डॉलर आहे. या निर्देशांकानुसार, हे अनेक वर्षांनंतर घडले आहे. जगातील कोणत्याही श्रीमंत व्यक्तीची संपत्ती 200 अब्ज डॉलर्स नाही.
फोर्ब्सची रिअलटाइम इंडेक्सवर वेगळं चित्र
फोर्ब्सच्या रिअलटाइम इंडेक्सवर चित्र थोडे वेगळे आहे. या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट देखील पहिल्या स्थानावर आहे, परंतु त्यांची एकूण संपत्ती 227.6 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. एलन मस्क या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 195.8 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, जेफ बेजोस यांची संपत्ती 194.6 अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
श्रीमंतांमध्ये अमेरिकेचा दबदबा
जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत अजूनही अमेरिकेचे वर्चस्व आहे. फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग या दोन्हींच्या टॉप-5 श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेबाहेरील एकच नाव आहे. बर्नार्ड अरनॉल्ट वगळता इतर चार श्रीमंत लोक अमेरिकेतील आहेत. भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 117.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग यादीत, ते 114 अब्ज डॉलर्ससह 11 व्या स्थानावर आहे.