केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांना पाठबळ देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. तसेच आरोग्याच्या संदर्भात देखील विविध योजनांचा लाभ दिला जातो. यातील एक योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना. या योजनेद्वारे अपंग असलेल्या व्यक्तिंना दरमहा आर्थिक पाठबळ दिले जाते. प्रत्येक महिन्याला सरकारकडून अपंग व्यक्तिंना या योजनेद्वारे 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
या योजनेचा उद्देश काय?
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेच्या माध्यमातून अपंग व्यक्तिंना अर्थ सहाय्य करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही तुम्ही अर्ज करु शकता.
कोण लाभार्थी?
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचा लाभ हा 18 ते 79 वयोगटातील 80 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आणि बहुअपंग असलेल्या व्यक्तिंना होतो.
'या' योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विहीत नमुन्यातील अर्ज
अपांगत्वचा दाखला
दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे).
किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र रहिवासी
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी
काय मिळणार लाभ?
अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतो.
कुठे कराल अर्ज
तहसील कार्यालय, सेतु केंद्र, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate