Advertisement

चोरीला गेलेला साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांमुळे मिळाला परत

प्रजापत्र | Wednesday, 28/02/2024
बातमी शेअर करा

बीड दि.28 (प्रतिनिधी)ः येथील सुभाष रोडवरील आर.के.मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानातून साडेचार लाखांचा माल चोरीला गेला होता. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात मागील महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी यातील आरोपीला ताब्यात घेवून चोरीला गेलेला पुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सुभाष रोडवर राहूल कदम (रा.घोसापूरी) यांचे आर.के.मेन्सवेअर कपड्याचे दुकान आहे. या दुकानातून साडेचार लाखांचे कपडे चोरीला गेले होते. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर गणेश अर्जुन परळकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली. सुरूवातीला गणेशने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर त्याने चोरीला गेलेला सर्व मुद्ेमाल पोलिसांना दिला. कालिका नगर भागामध्ये तो फिरत असल्याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले आहे. गणेश हा कपडे खरेदीच्या बहाण्याने या दुकानात सातत्याने येत होता. यातूनच त्याने चोरी करण्याचा डाव आखत साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शहर पोलिसांमुळे हा माल फिर्यादीला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विष्वंभर गोल्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, बाळासाहेब सिरसाट, गोवर्धन सोनवणे, राजेंद्र मुंडे, मनोज परजणे, अशपाक सय्यक, श्री.पवार यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement