Advertisement

नरेंद्र मोदींच्या सभेत राहुल गांधींचे फोटो

प्रजापत्र | Wednesday, 28/02/2024
बातमी शेअर करा

यवतमाळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महिला मेळाव्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

 

या मेळाव्याच्या ठिकाणी ठेवलेल्या खुर्च्यांना राहुल गांधी याचे फोटो आणि स्कॅनर कोडही चिकटण्यात आला होता. त्यामुळे राज्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान व्यवस्थपकांच्या हे लक्षात आल्यानंतर खुर्च्यांवरील राहुल गांधींचा फोटो हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली असून सभा नेमकी मोदींची की राहुल गांधींची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार या भागात नुकताच काँग्रेसची सभा झाली. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधींचे फोटो खुर्च्यांवर चिटकवले होते. मात्र, ज्या ठेकेदाराने त्या खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्याला पुरवल्या, त्याच खुर्च्या भाजपच्या कार्यक्रमाला पाठवल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला असून याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Advertisement

Advertisement