Advertisement

धनगर आरक्षणाचे वादळ राजधानीत धडकणार

प्रजापत्र | Tuesday, 27/02/2024
बातमी शेअर करा

अंबाजोगाई- धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणी करिता धनगर समाज बांधव आक्रमक झाला आहे.अंबाजोगाई इथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे हजारोंच्या संख्येने समाज बांधव कुच करत आहेत. शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकास अभिवादन करून यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले १ हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 

 

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी आग्रही भूमिका धनगर समाज बांधवांनी केली आहे. सरकार केवळ धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप देखील यावेळी धनगर बांधवांकडून करण्यात आला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच धनगर आणि धनगड एकच नाहीत हे देखील न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्यातील आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिलेला धनगर समाज यामुळे वंचितच राहणार आहे. 

Advertisement

Advertisement