बीड दि.२६ (प्रतिनिधी)- कपिलधार येथे सोमवारी (दि.२६) सकाळी चार ते पाच दिवसांचे बालक अज्ञातानी पोत्यात गुंडाळून फेकून दिले आहे.
अधिक माहिती अशी कि, मांजरसुंबा येथील काही युवक मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांना कपिलधार परिसरात पोत्यात गुंडाळून ठेवलेले पाच दिवसाचे बालक आढळून आले. त्यानी तात्काळ नेकनूर पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळी येऊन त्याला नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. काही काळ नेकनूर येथे त्याच्यावर उपचार करून त्याला बीड जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
बातमी शेअर करा