बीड-लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे होते.ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि जे निवडणूक विभागाशी थेट संबंधित येतात त्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.हे करत असताना राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक विभागाच्या नियमावलीला धाब्यावर बसवित अधिकार्यांनी मूळ परिपत्रकाला बाजूला सारत आपली मनमानी अनेक ठिकाणी दाखविली होती.मात्र यावर आक्षेप घेतल्यानंतर अखेर राज्यात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरु झाले आणि आता यात बीड जिल्ह्यातील ९ जणांच्या बदल्या झाल्यानंतर आता दोन पीआय आणि दोन एपीआय यांच्या देखील बदल्या जिल्हाबाहेर करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची जालना तर पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची धाराशिवला बदली करण्यात आली. यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब आणि नारायण व्यंकटी गित्ते बीडवरून छ. संभाजीनगर ग्रा. ला गेले आहेत. तर एपीआय विलास श्रीमंत मोरे, संदीप नाना पाटील छ. संभाजीनगर ग्रामीणवरून बीडला आले आहेत.