Advertisement

बसस्थानकासमोरील चक्री जुगारावर कारवाई

प्रजापत्र | Wednesday, 21/02/2024
बातमी शेअर करा

बीड-शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या बीड बसस्थानकासमोरील चक्री जुगार अड्डयावर बीड शहर पोलिसांनी छापा मारून १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.

 

    बीड शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून शीतलकुमार बल्लाळ यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचा सपाटाच सुरु ठेवला आहे. आज हॉटेल बंजाराच्या बाजूला सुरु असलेल्या चक्री जुगार अड्डयावर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या सुचनेनुसार एपीआय श्री. सिरसाट, मनोज परजने, अशपाक सय्यद यांनी छापा मारून रमेश गवळीराम मातकर (रा.चंपावती नगर) यास ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ९ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

Advertisement