बीड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज (शनिवार) जिल्ह्यात आणि तालुक्यातील गावा गावांत मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले.
घाटसावळी,पिंपळनेरमध्ये गावामध्ये मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. घाटसावळी गावातून जाणारा बीड -परळी महामार्ग आंदाेलकांना राेखला. पिंपळनेर गाव बंदची घोषणा मराठा बांधवांनी दिली.गेल्या अर्ध्या तासापासून हा महामार्ग अडवण्यात आल्यानं वाहतूक खोळंबली आहे. वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज देखील आंदोलन सुरू असल्याचा चित्र पाहायला मिळतंय.
बातमी शेअर करा