Advertisement

जरुड फाटा येथे रास्ता रोको 

प्रजापत्र | Wednesday, 14/02/2024
बातमी शेअर करा

 बीड -   बीड- परळी रस्त्यावर आज मराठा बांधवांकडुन तालुक्यातील जरुड फाटा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. 
राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील उपोषण आंदोलन सुरू केले आहे . याचेच समर्थन म्हणुन आज महाराष्ट्रात बंदची हाक समाज बांधवांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर आज जरूड फाटा परिसरातील मराठा समाज बांधवांनी बीड परळी रस्त्यावर रास्तारोको केलेले पहायला मिळते आहे .या रास्ता रोकोमुळे बीड परळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत . 

 

Advertisement

Advertisement