Advertisement

बीडमध्ये तरूणीवर बलात्कार

प्रजापत्र | Wednesday, 14/02/2024
बातमी शेअर करा

बीड (प्रतिनिधी) - लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नराधमाविरूध्द बलात्कारासह अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार बीडच्या एका प्रसिध्द हॉटेल, लॉजवर घडल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका २२ बर्षीय तरूणीला लग्राचे आमिष दाखवून एका तरूणाने मित्राच्या रूमबर ब बीड शहरातील एका प्रसिध्द हॉटेल, लॉजवर नेवून अत्याचार केला. त्यानंतर पिडितेने लग्नाविषयी विचारले असता मारहाण करून शिवीगाळ करत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल रात्री उघडकीस आला असुन या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आभिषेक पंजाब शिंदे (रा. शिवणी ता. बीड) याच्याविरूध्द कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ भांदवीसह कलम ३ (१) (आर) (एस) (डब्ल्यू) अनुसूचित जाती जमाती अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास डीवायएसपी गोल्डे करत आहेत.

Advertisement

Advertisement