राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाने धक्का दिला असून दिग्गज नेते अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत. अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस आमदारांचा मोठा गट बाहेर पडणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदारांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बातमी शेअर करा