काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत ११ आमदारदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याचं देखील कळतंय. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवल जात आहे.
काँग्रेसचे अशोक चव्हाण धक्का देणार?
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा समोर येत आहेत. अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर या बातम्या समोर आल्या आहेत.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. तसेच अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे