Advertisement

देशी विदेशी दारूचा साठा पकडला

प्रजापत्र | Friday, 09/02/2024
बातमी शेअर करा

बीड-शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेऊन मोजके दिवस झाले असतानाही पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी कारवायाचा धडाका सुरूच ठेवला आहे. आज बीड शहरातून देशी-विदेशी दारूचा जवळपास सव्वा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

  शहर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती की,एका पांढऱ्या ऍक्टिवा स्कुटीवर दारूचा बॉक्स पोत्यामध्ये लपून विक्रीसाठी आणणार होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपी गणेश येडे (वय-30) यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याने सुरुवातीला पोत्यात भाजीपाला असल्याचे सांगितले. मात्र झाडाझाडतीनंतर यात विदेशी-देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. दरम्यान या कारवाईत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर, आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सपोनी बाबासाहेब राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर , सुशील पवार, सय्यद अशपाक, मनोज परजणे, यांनी केली.

Advertisement

Advertisement