Advertisement

१८ वर्षांपासून गुंगारा देणारा आरोपी जेरबंद

प्रजापत्र | Thursday, 08/02/2024
बातमी शेअर करा

बीड - १८ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.शहादेव चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे.

 

पोलीस ठाणे दिंद्रुड गुरनं.14/2006 कलम-395 भादवी चा गुन्हा 11 आरोपितांनी मिळून केला.त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले व तपास करून चार शीट न्यायालयात सादर केले. त्यानंतर १८ वर्ष लोटूनही त्यामधील आरोपी हे कोर्टात हजर होत नसल्याने न्यायालयाने त्यांचा पकड वॉरंट जरी केला. आरोपी शहाद्या उर्फ शहादेव काँग्रेस चव्हाण रा.खांडवी शिवार,गेवराई हा बाजारात फिरत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यास जेरबंद करून दिंद्रुडच्या पोलीस ठाण्यात हजर केले असून आरोपीस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री राडकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप,पोलीस हवालदार प्रल्हाद चव्हाण,राहुल शिंदे ,चालक जायभाये यांनी केली आहे.
 

Advertisement

Advertisement