भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.
पण दुसऱ्या सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला दुखापत झाली आहे. विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वीच शुबमन गिल दिवसाच्या खेळात क्षेत्ररक्षण करू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली.सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ २५५ धावांवर बाद झाला आणि इंग्लंडला ३९९ धावांची मोठी धावसंख्या मिळाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताकडून शतक झळकावणारा शुभमन गिल चौथ्या दिवसाच्या खेळात मैदानात उतरला नाही. त्याच्यासाठी, बीसीसीआयने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले की, दुसऱ्या दिवसाच्या खेळात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करू शकणार नाही.
सर्फराजला मिळाली संधी
भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर निवडकर्त्यांनी दुसऱ्या सामन्यासाठी सर्फराज खानचा संघात समावेश केला. पहिल्यांदाच त्याची कसोटी संघात निवड झाल्यापासून त्याच्या पदार्पणाची चर्चा होती पण तसे झाले नाही. शुभमन गिलच्या दुखापतीमुळे त्याला विशाखापट्टणम कसोटीत मैदानात उतरण्याची संधी मिळाली. मैदानावरील अकरा खेळाडूंमध्ये सर्फराजचा समावेश होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर संघाने ३९६ धावा केल्या आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्सच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २५३ धावांवर आटोपला.पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाकडे १४३ धावांची आघाडी होती. दुस-या डावात शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले, भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले.