Advertisement

भरदिवसा महिलेचे दागिने लुबाडले  

प्रजापत्र | Thursday, 01/02/2024
बातमी शेअर करा

माजलगाव -  शहरात सतत घडणा-या चोरीच्या घटनेने चोरट्यांवरील पोलिसांचा धाक संपल्यागत स्थिती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच एका मुनिमास लुटण्याची घटना घडली होती. तर बुधवारी भर रस्त्यावर दोन महिलांना आमिष दाखवून लुबाडणूक करण्यात आली. यातील एक घटना तर पोलिस ठाण्या जवळच घडली आहे. दरम्यान चोरटे मोकाट सुटल्याने शहरातील नागरिकांत दहशत पसरली आहे.

 

 

शहरात चोरी, लुटमार अश्या विविध घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी आम्ही पोलिस आहोत असे वेगवेगळे बहाणे करून अनेक नागरिकांना भर दिवसा लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या एकाही घटनेचा अद्याप पोलिसांनी तपास लावलेला नाही. घटना घडल्यानंतर पोलिसांकडून काही दिवस हालचाल केल्या जाते, परंतु थोड्याच दिवसात जैसे थे परिस्थिती. परिणामी चोरट्यांचे मनोबल वाढत चालले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात शहरांमध्ये पुन्हा अशा घटना घडू लागल्या आहेत. याच महिन्यात बालाजी मंदिरासमोर एका महिलेस लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १५ जानेवारी रोजी हनुमान चौक ते झेंडा चौक या मुख्य रस्त्यावर गणपतराव आरसूळ यांना लुटले आहे.त्या घटनेचा तपास होतो ना होतो तोच पुन्हा

 

 

 

३१ जानेवारी रोजी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मुख्य रस्त्यावर शिवनंदा आसाराम अंकुशकर वय ७५ नावाच्या महिलेला तुमच्या गळ्यातलं सोनं द्या मी तुम्हाला सोन्याचे बिस्किट देतो म्हणून बनावट बिस्कीट देऊन तिच्या गळ्यातील सोन्याची पोत लुटली. तर दुपारी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये एका महिलेला या भुरट्या चोरट्यांनी शाब्दिक बनाव करून तिच्याही गळ्यातील सोन्याचे मौल्यवान वस्तू लुटल्या आहेत. यातील एक घटना तर पोलीस ठाण्याजवळच घडली आहे. चोरट्यांच्या लुटमारीने माजलगाव पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले . नूतन पो.नि. पो. केतन राठोड यांना चोरट्यांनी हे आव्हान समजले जात. तर नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement