देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत मांडला. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी अभिनंदन करतो. मोठ्या जड अंत:करणाने शेवटचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
अर्थमंत्री यांनी संसदेत म्हटलं की, सरकार चार जातींसाठी काम करणार आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यासाठी काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाषण केलं. त्यांनी त्यांनी जे धाडस दाखवलं त्यांचं अभिनंद करतो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
१० वर्षातील अर्थसंकल्पात नुसत्या थापा मारल्या
मोदी सरकारने २०१४ पासून २०२४ पर्यंत १० अर्थसंकल्प मांडले. या सर्वांमध्ये नुसत्या थापा मारल्या. मतं हवं असतील तर 'मेरे प्यारे देशवासियो...' आणि त्यानंतर तुम्ही जगलात काय आणि मेलात काय याचा काहीच फरक पडत नाही. आता घोषणा करतील मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा महागाई वाढवतील, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
राम भाजपची खासगी प्रॉपर्टी नाही
अयोध्येत राम मंदिर झालं याचा आम्हालाही आनंद आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लढ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. राम काही भाजपची खासगी प्रॉपर्टी नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.