Advertisement

वाळूच्या ट्रॅक्टरने दोघांना उडविले !

प्रजापत्र | Wednesday, 31/01/2024
बातमी शेअर करा

माजलगाव- आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीवरील पुलावर शिवार सादोळा येथे नांदेडकडे विजय युवराज पगारे (वय ३७), महेश रावसाहेब ढोकचोळे (वय ३३ रा.रांजणखोल) मोटारसायकल (क्र.एम.एच.१७-सी.डब्ल्यू-३२०९) याला पाठीमागून ट्रॅक्टर (क्र.एम.एच.२३-टी-५४२८) च्या चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दोन तरूण जागीच ठार झाले. या ठिकाणाहून ट्रॅक्टर चालक पळून गेल्याचे बोलले जात आहे.याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून त्या दोन्ही मयतावर माजलगाव शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन केले. सदरील ट्रॅक्टर चालकाविरूध्द कलम ३०४(अ),२७९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय विजयसिंग जोनवाल करीत आहेत.

Advertisement

Advertisement