बीड - शहरातील सावतामाळी चौकात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर आज पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई पोलीस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी केली. बीड शहरातील सावतामाळी चौकात चक्री नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला.त्या ठिकाणावरून आरोपी प्रशांत भलशंकर याला ताब्यात घेण्यात आले. त्या ठिकाणावरून जुगाराचे साहित्य, रोख रकमेसह एकूण ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांनी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बातमी शेअर करा