बीड-मागच्या तीन दिवसात महसूल विभागात दोन लाचखोर अधिकारी पकडल्यानंतर आता युसूफवडगाव पोलीस ठाण्यात काही वेळा पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस हवालदारला पाच हजारांची लाच घेताना पकडले आहे.
बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले असून मागच्या काही दिवसापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायातून ही बाब समोर येताना दिसत आहे. आज अवैध गुटखाच्या प्रकरणात श्री. मुंडे नामक पोलीस हवालदार पाच हजारांची लाच घेताना एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा