बीड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमालांना माहे सप्टेंबर २०२३ पासून केलेल्या कामाची मजुरी माथाडी मंडळाकडे पाठवणे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शासकीय धान्य गोदामातील हमाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
बातमी शेअर करा