केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या अभिषेक समारंभात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केल्यानंतर केंद्राने देशातील केंद्र सरकारी आस्थापने अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बातमी शेअर करा