Advertisement

शिवसेना आमदार अपात्रता निकालावर राहुल नार्वेकरांना हायकोर्टाची नोटीस

प्रजापत्र | Wednesday, 17/01/2024
बातमी शेअर करा

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत शिवसेना शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडलीच. उच्च न्यायालयाने याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसह शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे.

 

 

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फरदोश पुनीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

Advertisement