Advertisement

राष्ट्रवादी पोलिस बॉईज असोसिएशनच्या मागणीला अखेर यश

प्रजापत्र | Thursday, 11/01/2024
बातमी शेअर करा

धाराशिव / प्रतिनिधी  - सन २०२१  पासून पदोन्नती पासून वंचित असलेले राज्य पोलीस दलातील सुमारे ८०० च्या आसपास पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय)आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) यांची रखडलेली पदोन्नती करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र राज्यप्रमुख प्रमोद तानाजी वाघमारे तसेच राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी प्रत्येक जिल्ह्यातून , ऑगस्ट 23 मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.

 

 

 तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनात सुद्धा या मागणीचे निवेदन देण्यात आले होते.पोलीस खात्यात प्रत्येक वेळेस पदोन्नतीच्या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांवर कशा प्रकारे अन्याय करून त्यांचे खच्चिकरण केले जाते या संदर्भात सतत पाठपुरावा करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात ही बाब आणून दिली होती. त्यामुळे सुमारे ०२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पदोन्नतीच्या मागणीला पूर्ण करून प्रमोद वाघमारे यांनी अवघ्या ०४  महिन्यात पोलीस अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे.

 

 

 असून सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावर असलेले १७१ पोलीस अधिकारी यांची पोलीस निरीक्षक (पीआय) या पदावर पदोन्नती करण्यात यावी असा आदेश ,
२९ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस महासंचालकांनी दिला. उर्वरित ६८१ पोलीस अधिकारी यांची सुद्धा लवकरच पदोन्नती होणार असून  ०३ जानेवारीपर्यंत त्यांचा संवर्ग मागविण्यात आला आहे.

 

 

मागील ०२ वर्षांपासून कोणतेही कारण नसताना पदोन्नती पासून वंचित असलेले हे सर्व पोलीस अधिकारी कुठेतरी नाराज झाले होते. अखेर त्यांच्या मदतीला राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशन धावून आली असून  राज्यप्रमुख प्रमोद वाघमारे यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा करून अवघ्या ०४ महिन्यात या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे पदोन्नती झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशनचे राज्यप्रमुख प्रमोद वाघमारे यांचे आभार मानले आहेत.

Advertisement

Advertisement