बारामती- आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी (दि. ५) सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक येथे पोहोचले. या कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे. अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांना सातत्याने केंद्रीय व राज्यातील यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे. दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनाकडून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
बातमी शेअर करा