Advertisement

कधी मिळणार PM किसानचा सोळावा हप्ता ? 

प्रजापत्र | Wednesday, 27/12/2023
बातमी शेअर करा

देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना १५ हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. असे वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. दरम्यान, शेतकऱ्यांना १६  वा हफ्ता कधी मिळणार? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती. 

 

 

फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये मिळणार १६ वा हफ्ता?
केंद्र सरकार फेब्रुवारी २०२४ ते मार्च २०२४ दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारने १५ नोव्हेंबर २०२३ रोजी योजनेचा १५ वा हप्ता जारी केला होता. पीएम-किसान योजनेअंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष ६,००० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

 

 

पीएम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे. जी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित कामांसाठी तसेच घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे, ते योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात ८० दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांना १८,०००  कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनेचा १५ वा हप्ता जारी केला होता. यापूर्वी, सरकारने १४  हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना २. ६२ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे.

Advertisement

Advertisement