मुंबई - राष्ट्रवादी आणि काँग्रेससह महाविकास आघाडीला एमआयएमकडून ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं मत खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे, आता यावरूनच महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. "इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल, तर त्यांनी पक्ष बदलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावे. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीत यावे," अशी नवीन ऑफर जलील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
जलील यांच्या प्रस्तावावर बोलतांना दानवे म्हणाले की, "इम्तियाज जलील यांना इंडिया आघाडीत यायचं असेल, तर त्यांनी पक्ष बदलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावेत. इम्तियाज जलील यांना एवढेच इंडिया आघाडीवर प्रेम असेल तर त्यांनी आपला पक्ष बदलावा. तसेच, इम्तियाज जलील जरी इंडिया आघाडीत येण्याचं सांगत असेल, पण यासाठी त्यांच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का?," असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला