Advertisement

वंचित बहुजन आघाडीने बोलावली राज्य कार्यकारिणीची तातडीची बैठक 

प्रजापत्र | Monday, 25/12/2023
बातमी शेअर करा

 नागपूर - आगामी  लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे 'इंडिया आघाडी' तर दुसरीकडे एनडीएतील पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. अशात आता  वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या, मंगळवार २६ डिसेंबरला  नागपूरात पार पडणार आहे. या बैठकी मधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील ३० लोकसभा जागांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

वंचित बहुजन आघाडीने आता पर्यंत सातत्याने भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्र व्यवहार आणि आपल्या भाषणातून जाहीरपणे एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आता कितपत यश येतंय याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आता तातडीने बोलावण्यात आलेल्या या राज्य कार्यकारिणीची बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर काय मोठा निर्णय घेतील याकडे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Advertisement

Advertisement