Advertisement

शिक्षणात पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश करणार 

प्रजापत्र | Monday, 25/12/2023
बातमी शेअर करा

 रत्नागिरी-  कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यवहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. खरंतर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार असल्याची घाेषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली.

 

शिक्षकांना कृषी प्रशिक्षण देणार

राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या-त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर कृषीचे प्रशिक्षण घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कृषीचे शिक्षण देणार आहेत. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.

 

Advertisement

Advertisement