महाराष्ट्रात थंडी चांगलीच वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीने डोकं वर काढलं आहे. राज्याच्या काही भागात थंडीचा पारा देखील घसरला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका आणखी जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यासह देशातील काही भागांमध्ये तापमानात अचानक बदल झाला आहे. राज्यात काही ठिकाणी गारठा सुरु झाला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील थंडीचा पारा घसरल्याने नागरिकांनी पहाटे घराबाहेर पडणं बंद केलं आहे.
हिंगोलीत थंडी वाढली
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीमध्ये १२ ते १३ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्याचे तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस असल्यामुळे नागरिक सकाळ सकाळ चालताना, धावताना पाहायला मिळत आहेत. तर जागोजागी शेकोट्या पेटलेल्या आहेत.
४८ तासात वाढणार थंडी
पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडं राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळं ४८ तासांमध्ये राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी थंडीचा कडाका आणखी जाणवू शकतो.