लोकसभेतून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्याचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र आहे. काल लोकसभेत ३३ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर आज पुन्हा एकदा विरोधकांच्या ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरुर यांचा यामध्ये समावेश आहे.
संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. घुसखोरीनंतर लोकसभेच्या कामकाजात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. संसद सुरक्षेच्या प्रश्नावरुन आजही लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ज्यानंतर पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.काल ३३ खासदारांचे निलंबन केल्यानंतर आता पुन्हा तब्बल ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज निलंबित केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरुर यांच्या नावाचा समावेश आहे.
आत्तापर्यंत १४१ खासदार निलंबित..
दरम्यान, याआधीही संसदेच्या कामकाजात गोंधळ घातल्या प्रकरणी १९ आणि त्यानंतर ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आता पुन्हा ४९ खासदारांचे निलंबन झाल्याने कारवाईचा आकडा १४१ वर गेला आहे. देशाच्या इतिहासात लोकसभा आणि राज्यसभेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे