ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे. हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरला आहे.
केंद्राच्या निर्णयाचं स्वागत, पण....राजू शेट्टी काय म्हणाले?
केंद्र सरकारनं इथेनॉलच्या निर्मितीला दिलेल्या परवानगीचे स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्वागत केलं आहे. इथॉनॉलच्या निर्मितीवर बंदी घालणं हा चुकीचा निर्णय होता. जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जीवाश्म इंधनाला इथेनॉल हा पर्याय असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करावा अशी अट सरकारनं घातली आहे. ही अट 35 लाख टनापर्यंत वाढवावी अशी मागणी राजू शेट्टींनी केलीय. साखरेचं उत्पादन गरजेपुरतं होणार असल्याचे शेट्टी म्हणाले.