Advertisement

लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून २ तरुणांच्या उड्या

प्रजापत्र | Wednesday, 13/12/2023
बातमी शेअर करा

  दिल्ली- संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण होत असताना संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षकांसाठीच्या गॅलरीमधून दोन जणांनी लोकसभेत उड्या टाकल्या. आसपास असलेल्या खासदारांनी दोघांना पकडलं. त्यानंतर लोकसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सदनात जनहिताच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. पश्चिम बंगालचे भाजप खासदार खगेन मुर्मू भाषण करतेवेळी दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खासदारांसह सारेच गोंधळले. यानंतर पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केलं.

 

संसदेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकणाऱ्या दोघांपैकी एकाचं नाव सागर असल्याचं कळतं. दोन्ही तरुण लोकसभेचा व्हिजिटर पास घेऊन आले होते. म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावे लोकसभा व्हिजिटर पास घेऊन दोन तरुण आले होते, अशी माहिती खासदार दानिश अली यांनी दिली.

Advertisement

Advertisement