मुंबई - ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचं? यावरून सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक निवडणूक आयोगात संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा, या मागणीसाठी अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. आश्चर्य म्हणजे या याचिकेतून सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि स्वत: शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलंय. या घडामोडीनंतर खासदार अमोल कोल्हे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी विधान भवनात पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या कार्यालयात उभय नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. या सगळ्यानंतर अमोल कोल्हे आपली भूमिका बदलून अजित पवार यांना पाठिंबा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बातमी शेअर करा