नवी दिल्ली - स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात घटनाकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला संविधान दिनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा विराजमान होणार आहे. हरियाणातील मानेसर इथे पुतळ्यांचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी, बाय, चंद्रचूड् यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. ७ फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात समोरच्या हिरवळीवर आणि बागेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवला जाईल.
प्रजापत्र | Thursday, 23/11/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा