Advertisement

ऊस दराबाबत चौथ्या बैठकीतही तोडगा नाहीच

प्रजापत्र | Wednesday, 22/11/2023
बातमी शेअर करा

कोल्हापूर- गेल्या वर्षीच्या तुटलेल्या उसाला आम्ही ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली होती आता आम्ही तीन पावलं मागे येत आहोत. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला शंभर रुपयांचा दुसरा हप्ता द्या, कारखानदारांनी यासाठी तडजोड करू नये असे म्हणत शेतकरी संघटना आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज मुंबईत चौथी बैठक झाली. मात्र ती देखील निष्फळ ठरली. यामुळे उद्या राष्ट्रीय महामार्ग रोखून धरून कारखानदारांना हिसका दाखवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला ते बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्याचा पंधरवडा उलटला तरीही अजूनही सुरू झाला नाही. कारखानदारांना साखर विक्रीतून मिळालेल्या अतिरिक्त नफ्यातून शेतकऱ्यांना गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा. तसेच यंदाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे.

Advertisement

Advertisement