मुंबई- वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही महिन्यापूर्वी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार अनुकूल असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीला लवकरच इंडियामध्ये सहभागी करण्यात येणार आहे. इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांचा समावेश केला जाईल अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली. या बैठकीत पवार आणि आंबेडकरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार अनुकूलता दर्शवली. त्यानंतर इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाबाबत घटक पक्षांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. नुकतेच प्रकाश आंबेडकरांकडून राहुल गांधींना संविधान महासभेचं निमंत्रण देण्यात आले आहे.