मराठवाडा पाणी प्रकरणी सध्या जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामधून मराठवाड्यासाठी मोठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थिगिती नाकारली असून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखला आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. पश्चिम महाराष्ट्रातील पद्मसिंह विखे पाटील साखर कारखाना, संजीवनी सहकारी साखर कारखान्याने जायकवाडीत पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबरच्या आदेशाला स्थिगिती देण्यासाठीसर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आज सर्वोच्च न्यायालयात जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशावर सुनावणी झाली. यामध्ये सुप्रीम कोर्टाने जलसंपदा विभागाने दिलेल्या ३० ऑक्टोंबरच्या निर्णयाचे पालन करुन शकते. सर्वोच्च न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करु शकत नसल्याचे म्हणले आहे.