Advertisement

राज्यात तब्बल २९ लाख कुणबी मराठा नोंदी

प्रजापत्र | Saturday, 18/11/2023
बातमी शेअर करा

मुंबई-  राज्य सरकारने गेल्या १५ दिवसांत मराठा कुणबी नोंदी तपासल्या. त्यात पूर्वीही ज्यांना आरक्षणाचा  लाभ होत होता त्यांचाही तपास करण्यात आला. राज्यात गेल्या १५ दिवसांत २९ लाख १ हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत. तर सर्वाधिक नोंदी विदर्भात आढळल्या आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलनाचं काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सापडलेल्या बहुतेक नोंदी नव्या आहेत. सांगलीत प्रमाणपत्र वाटपासाठी खास वेबसाईट, कार्यालय तयार करण्यात आले आह. 

 

आतापर्यंत सापडेल्या नोंदींमध्ये विदर्भात सर्वाधिक तर  ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी  तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून आठ कोटी ९९ लाख ३३ हजार २८१ नोंदींपैकी कुणबी- मराठा जातीच्या २९ लाख एक हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत. सर्वात जास्त कुणबी नोंदी या  विदर्भामध्ये सापडल्या आहेत. विदर्भात आतापर्यंत १३ लाख ३ हजार ८८५ नोंदी सापडल्या आहेत. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी कुणबी नोंदी या कोकणात सापडल्या आहेत. कोकणात  जवळपास साडेपाच लाख नोंदी तपासल्याानंतर सर्वात कमी ११८ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी नव्याच आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलीत करण्याचे काम सुरू आहेत. 

Advertisement

Advertisement