Advertisement

मंत्र्यांच्या अनुपस्थितीत शिंदेंच्या मंत्रिमंडळाने घेतले सहा निर्णय 

प्रजापत्र | Friday, 17/11/2023
बातमी शेअर करा

दिवाळीनिमित्त आपापल्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर असल्याने शिंदेंचे अनेक मंत्री मंत्रालयातील आजच्या कॅबिनेट बैठकीला आले नाहीत. तर छगन भुजबळ हे ओबीसी मेळाव्याला आहेत. असे असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळाने आज महत्वाचे सहा निर्णय घेतले आहेत. 

 

 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय...

 

मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार ( जलसंपदा विभाग) 
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ ( ग्रामविकास विभाग)
 आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता ( उच्च व तंत्रशिक्षण)
 राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)

Advertisement

Advertisement