राज्यात मराठा सामाजाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारही हादरले आहे. त्यानंतर ओबीसी आणि धनगर समाजाकडूनही आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहेत. परंतु आपल्या आंदोलनामुळे राज्याला नव्हे तर केंद्र सरकारला हादरुन सोडणारे अण्णा हजार पुन्हा सक्रीय झाले आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. १९ नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत अण्णा आंदोलन करणार आहेत. यामुळे पुन्हा राज्यात अण्णा हजारे यांचे आंदोलन राज्यात दीर्घ काळानंतर दिसणार आहे.
अण्णा हजारे यांनी कशासाठी पुकारले आंदोलन
अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १९ नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे आंदोलन करणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, देशातील सैनिकांचे भविष्य अधांतरी असू नये, यासह सैनिकांच्या मुलांना शिक्षण मोफत देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील माजी सैनिक सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अण्णा हजारे करणार आहे. या आंदोलनामुळे देशभरातील सैनिक सरकार विरोधात राळेगणसिद्धीत एकटवणार आहे. त्यांना अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहे