Advertisement

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मायदेशात परतताच सोडणार कर्णधारपद?

प्रजापत्र | Saturday, 11/11/2023
बातमी शेअर करा

विश्वचषकादरम्यान एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मायदेशात परतताच कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. २०२३च्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पाकिस्तानी मीडिया सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की, क्रिकेट बोर्ड आणि माजी क्रिकेटपटूंच्या वागणुकीमुळे निराश झालेला बाबर आझम भारतातून पाकिस्तानला परतल्यानंतर एकदिवसीय आणि टी२० संघाचा राजीनामा देऊ शकतात. पाकिस्तानचा संघ अजूनही विश्वचषक २०२३ मध्ये उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे, परंतु पात्र होण्याची शक्यता खूपच धूसर आहे.

 

विश्वचषक २०२३ मध्ये खराब कामगिरी
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची कामगिरी काही खास नव्हती, त्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच बाबर आता कर्णधारपद सोडू शकतो. सूत्रांकडून अशीही बातमी समोर येत आहे की, कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद हे त्याच्याचकडे ठेवले जाऊ शकते. विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांत आठ गुण झाले आहेत. संघाचा शेवटचा साखळी सामना आज (११ नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी, संघाला मोठा विजय नोंदवावा लागेल, कारण न्यूझीलंडची निव्वळ धावगती +०.७४३ आहे तर पाकिस्तानची +०.०३६ आहे.

Advertisement

Advertisement