Advertisement

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 28/10/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री ११.३० वाजताच्या घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे. 

 

 

 मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तेथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पुढील तपास पोलीस करत असून अधिक माहिती समोर येऊ शकणार आहे.मात्र काशीद यांच्या कुटुंबियांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शत्रुघ्न काशीद यांचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा मृतदेह अंबाजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठेवण्यात आला आहे.त्यांच्या पाच्यात आई,वडिल,पत्नी एक मुलगी,दोन मुले असा परिवार आहे. 

 

 

Advertisement

Advertisement